Ad will apear here
Next
‘वंचितांच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळावा’
अरुण खोरे यांनाशरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे : ‘आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. वंचितांसाठी झटणाऱ्या चांगल्या प्रवृत्तीही समाजात आहेत. त्यामुळे वंचितांसाठीचे हे कार्य असेच पुढे सुरू ठेवायला हवे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, भटक्या विमुक्त जमाती संघटना व भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे (मानचिन्ह व १० हजार रुपये रोख), जीवनगौरव पुरस्कार अंकुश काळे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) व युवा साहित्य पुरस्कार सुप्रिया सोळांकूरे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धीची अपेक्षा नसते. या घटकांचे भले होण्यातच त्यांना समाधान असते. त्यासाठी कोणी लेखणीतून, तर कोणी साहित्यातून, तर कोणी प्रत्यक्ष काम करून आपल्या भावना रेखांकित करतात.’

खोरे म्हणाले, ‘सर्व चळवळीत एका व्यक्तीवर कायम अन्याय झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी होय. गांधीजींना अस्पृश्य न ठेवता चळवळींशी जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी वैचारिक सांधेजोड झाली पाहिजे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZTPCA
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयकपदी सुहास उभे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयक पदावर कोथरुड येथील युवा कार्यकर्ते सुहास उभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला पूणे येथे होत असून, त्यानिमित्त राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभाही याचदिवशी पार पडणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
‘तळजाई’वरील क्रीडांगणाचे २६ नोव्हेंबरला लोकार्पण पुणे : ‘पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून येथील तळजाई टेकडीवर महान क्रिकेटपटू कै. सदू शिंदे यांच्या नावाने एका सुसज्ज क्रिकेट क्रीडांगणाची निर्मिती केली आहे. पुण्यातील नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर उभारलेल्या या क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा २६ नोव्हेंबर २०१८ रोजी माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या
‘दुष्काळी दौऱ्यात सत्कार स्वीकारणार नाही’ बारामती/दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाच जून २०१९ रोजी एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरू केला आहे. या वेळी त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी दिल्या.या दौऱ्यादरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language